Flipkart : Redmi Note 13 Pro Series आजपासून थेट विक्रीसाठी उपलब्ध ; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Flipkart : Redmi ने 4 जानेवारी रोजी आपल्या यूजर्ससाठी Redmi Note 13 सीरीज लाँच केली आहे. या सिरीजमध्ये कंपनीने तीन नवीन स्मार्टफोन्स Redmi Note 13, Redmi Note 13 Pro, Redmi Note 13 Pro+ सादर केले आहेत. आज म्हणजेच 10 जानेवारी रोजी कंपनी या मालिकेची पहिली विक्री (Flipkart) थेट करणार आहे. या निमित्ताने प्रो सीरीज कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ग्राहक Redmi Note 13 Pro Series ची सुरुवातीच्या किमतीत 24 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकतील. चला फोनच्या सेल डिटेल्सवर पटकन नजर टाकूया

ग्राहक ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट (Flipkart) फ्लिपकार्टवरून Redmi Note 13 Pro Series फोन खरेदी करू शकतील. या फोनची पहिली विक्री आज म्हणजेच 10 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता थेट सुरु झाली आहे. बँक ऑफरसह, फोन 23,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो.

Redmi Note 13 Pro Series चे स्पेसिफिकेशन (Flipkart)

प्रोसेसर– Snapdragon 7s Gen 2 चिपसेट Redmi Note 13 Pro मध्ये उपलब्ध आहे. Redmi Note 13 Pro Plus मध्ये Dimensity 7200-Ultra प्रोसेसर आहे.

डिस्प्ले– Redmi Note 13 Pro Series फोन 6.67-इंचाच्या AMOLED डिस्प्लेसह येतो.

रॅम आणि स्टोरेज- Redmi Note 13 Pro फोन 12GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह येतो. Redmi Note 13 Pro Plus फोन 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंत स्टोरेजसह येतो.

कॅमेरा– दोन्ही Redmi फोनमध्ये OIS सह 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेरा आहे.

बॅटरी– Redmi Note 13 Pro फोन 67W चार्जिंग सपोर्ट आणि 5100mAh बॅटरीसह येतो. Redmi Note 13 Pro Plus फोन 120W चार्जिंग सपोर्ट (Flipkart) आणि 5000mAh बॅटरीसह येतो.

Scroll to Top