Oppo : 8000mAh बॅटरी असलेला नवीन टॅबलेट लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Oppo ने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन प्रोडक्ट लाँच केले आहे. कंपनीने युजर्ससाठी Oppo Pad Neo लॉन्च केला आहे. Oppo चे हे डिवाइस मलेशियामध्ये लॉन्च करण्यात आले आहे. यासह मलेशिया हे उत्पादन लॉन्च करणारी पहिली बाजारपेठ बनली आहे. Oppo Pad Neo- चे स्पेसिफिकेशन आणि किंमत यासंबंधी अधिक जाणून घेऊया…

Oppo Pad Neo ची वैशिष्ट्ये

चिपसेट– पॅड निओ हेलिओ G99 चिपसेटसह आणले आहे. कंपनीने Oppo Pad Neo ला 6 GB/8 GB LPDDR4x रॅम आणि 128 GB UFS 2.2 स्टोरेजसह आणले आहे.

डिस्प्ले– कंपनीने 11.35-इंचाच्या LCD पॅनेलसह Oppo Pad Neo सादर केला आहे. डिव्हाइसचा डिस्प्ले 2.4K रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. 538 ग्रॅम वजनाचे Oppo चे हे पॅड 400 nits पर्यंत कमाल ब्राइटनेस देते.

बॅटरी-ओप्पो पॅड निओ 8,000mAh बॅटरीसह लॉन्च करण्यात आला आहे. डिव्हाइसची बॅटरी 33W SuperVOOC चार्जिंगसह येते.

कॅमेरा – Oppo आपल्या नवीन टॅबलेटमध्ये ऑटोफोकस सपोर्टसह 8MP बॅक कॅमेरा ऑफर करतो. यासोबतच, डिवाइसमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे.

कंपनीने डॉल्बी अॅटमॉससह क्वाड स्पीकर्ससह टॅबलेट सादर केला आहे. टॅबलेटमध्ये सिम सपोर्ट, वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.2, जीपीएस आणि यूबीएस-सी पोर्ट आहे.

किंमत

कंपनीने Oppo Pad Neo फक्त Wi-Fi आणि LTE व्हर्जनमध्ये सादर केले आहे. 6GB + 128GB (Wi-Fi) आवृत्तीची किंमत RM 1,199 (अंदाजे $258) आणि 8GB + 128GB (LTE) आवृत्तीची किंमत RM 1,399 (अंदाजे $301) आहे. कंपनी या टॅबलेटसोबत पॅड निओ स्मार्ट केस देखील देत आहे.

Scroll to Top