Redmi : बाजारात लाँच झालाय नवा मोबाईल ; पहा फीचर्स आणि किंमत ?

Redmi : कंपनीने ऑक्टोबर महिन्यात  Redmi Note 13,Redmi Note 13 Pro , Redmi Note 13 Pro + स्मार्टफोन लॉन्च केले होते. आता कंपनीने चिनी बाजारपेठेत Redmi Note 13R Pro मोबाईल लॉन्च केला आहे. या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोनमध्ये कंपनीने सिंगल स्टोरेज वेरियंट उपलब्ध केला आहे. हा मोबाईल मिडनाईट ब्लॅक, टाईम ब्ल्यू, मॉर्निंग लाईट गोल्ड कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. आज आपण या मोबाईलची किंमत आणि त्यामध्ये देण्यात आलेले खास फीचर्स जाणून घेऊयात.

Redmi Note 13R Pro : स्पेसिफिकेशन

डिस्प्ले

  • Redmi Note 13R Pro या स्मार्टफोन मध्ये 6.67 इंच FHD +OLED डिस्प्ले
  • हा डिस्प्ले 2400 × 1080 पिक्सेल रिझोल्युशन आणि 120 hz रिफ्रेश रेट
  • हा डिस्प्ले 2160 hz टच सॅम्पलिंग रेट, 1920  pwm डीमिंग,1000 nits ब्राईटनेस  देतो.
  • या मोबाईल मध्ये कंपनीने मीडियाटेक डायमेंसिटी 6080 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला आहे.

कॅमेरा

  • Redmi Note 13R Pro मध्ये  ड्युअल रियर कॅमेरा सपोर्ट उपलब्ध आहे.
  • या मोबाईलच्या बॅक पॅनलवर 3X इन झूम क्षमता असलेला 108 MP प्रायमरी कॅमेरा, 2 MP डेफ्थ सेंसर आहे.
  • समोरील बाजूला 16 MP चा फ्रंट कॅमेरा.
  • या मोबाईल मध्ये 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे.

बॅटरी

  • या मोबाईलमध्ये  5000 MAH बॅटरी देण्यात आली आहे.
  • ही बॅटरी 33 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कनेक्टिव्हिटी फीचर्स

  • यात IR BLASTER, USB TYPE C PORT, वाय-फाय, ब्लूटूथ
  • साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटन आणि फेस अनलॉक फीचर्स देखील उपलब्ध आहे.

किंमत

Redmi Note 13R Pro हा स्मार्टफोन चिनी मार्केटमध्ये सिंगल स्टोरेज वेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्यानुसार 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 1999 युवान एवढी आहे. म्हणजेच भारतीय करन्सीनुसार 23,000 रुपयांच्या किमतीमध्ये हा मोबाईल लॉन्च करण्यात आला आहे.

Scroll to Top