Samsung Galaxy : लवकरच लॉन्च होणार Samsung Galaxy A55 स्मार्टफोन ; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Samsung Galaxy : Samsung ची Galaxy रेंज अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. आता Samsung Galaxy A55 चे स्पेसिफिकेशन्स आणि रेंडर्स ऑनलाइन समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या फ्लॅट डिस्प्लेसह येईल. रेंडर्स नुसार Galaxy A55 मध्ये डिस्प्लेवर होल पंच कटआउट असेल. यात ट्रिपल रिअर कॅमेरेही दिसत आहेत. हँडसेट Exynos 1480 SoC चिपसेटसह सुसज्ज असण्याची शक्यता आहे. Galaxy A55 Galaxy A54 5G चा पुढचा टप्पा म्हणून लॉन्च होईल, जो या वर्षी मार्चमध्ये भारतात लॉन्च झाला होता. या लेखात स्मार्टफोनच्या फीचर्स बद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Samsung Galaxy A55 चे स्पेसिफिकेशन्स

मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअपसह स्मार्टफोन ब्लॅक शेडमध्ये दिसत आहे. कॅमेरा सेन्सर्सच्या पुढे एक लहान एलईडी फ्लॅश असेल. याव्यतिरिक्त, पॉवर बटण आणि व्हॉल्यूम रॉकर उजव्या बाजूला असेल. लीकनुसार, Galaxy A55 मध्ये फुल HD+ रिझोल्यूशन आणि 120Hz स्क्रीन रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा फ्लॅट डिस्प्ले असेल.

Samsung Galaxy A55 चे फीचर्स

माहितीनुसार, Galaxy A55 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा FHD+ डिस्प्ले असेल. Samsung Galaxy A55 मध्ये 50MP प्राथमिक रियर कॅमेरा असेल. व्हिडिओ आणि सेल्फीसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा असेल. 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटसाठी याची किंमत 38,999 रुपये असेल. हा मोबाईल ऑसम लाइम, ऑसम ग्रेफाइट, ऑसम वायलेट आणि ऑसम व्हाइट कलर मध्ये उपलब्ध असेल. स्मार्टफोनमध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी असल्याची माहिती आहे.

Scroll to Top