Samsung Galaxy Z Flip 5 : चे Retro व्हर्जन लाँच; पहा फीचर्स आणि किंमत

Samsung Galaxy Z Flip 5

Samsung Galaxy Z Flip 5 : सध्या मोबाईल मार्केटमध्ये 5G आणि फोल्डेबल स्मार्टफोनची मोठ्या प्रमाणात चलती आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बऱ्याच कंपन्या आता फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च करत आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy Z Flip 5 हा मोबाईल लाँच केला होता, आता हाच मोबाईल कंपनीने Retro व्हर्जन मध्ये आणला आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स आणि किमतीबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊया….

Samsung Galaxy Z Flip 5 Retro या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोन मध्ये  ब्ल्यू कलर पॅनल आणि मॅट फिनिशिंग फ्रेमचा वापर करण्यात आला आहे. या मोबाईल (Samsung Galaxy Z Flip 5) सोबत फ्लिप सूट कार्ड,  फ्लिप सूट केस, सॅमसंग लोगो, युनिक सिरीयल नंबर सह एक कलेक्टर कार्ड उपलब्ध करण्यात आले आहे. त्याचबरोबर वॉटर रेजिस्टन्ससाठी या स्मार्टफोनला IPX8 रेटिंग देण्यात आलं आहे.

डिस्प्ले,प्रोसेसर,स्टोरेज,बॅटरी

  • या स्मार्टफोनमध्ये  6.7 इंच चा फुल HD + डायनामिक AMOLED 2X इन्फिनिटी फ्लेक्स इनर डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120 hz  रिफ्रेश रेट  सह येतो.
  • 3.4 इंच चा सुपर AMOLED कव्हर डिस्प्ले सुद्धा यामध्ये देण्यात आला आहे. हा कव्हर डिस्प्ले  फोल्डर साईज मध्ये 60 hz रिफ्रेश रेट सह येतो.
  • या मोबाईल मध्ये कस्टम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर देण्यात आलं असून Samsung चा हा (Samsung Galaxy Z Flip 5) फ्लिप स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर आधारित ONEUI 5.1.1 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो.
  • मोबाईलमध्ये 3700 MAH बॅटरी वापरण्यात आली आहे. ही बॅटरी 25 W FAST चार्जिंगला सपोर्ट करते. या मोबाईल मध्ये 8 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे.

कॅमेरा

  • यामध्ये (Samsung Galaxy Z Flip 5) ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे.
  • यामध्ये 12 MP अल्ट्राव्हाइड प्रायमरी कॅमेरा, OIS सपोर्टसह 12 MP वाईड अँगल कॅमेरा,
  • समोरील बाजूला 10 MP चा सेल्फी कॅमेरा उपलब्ध करण्यात आला आहे.

किंमत

8 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 1,09,999 रुपये आहे. यापूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या सॅमसंगच्या (Samsung Galaxy Z Flip 5) Z FLIP 5 या स्मार्टफोन मध्ये 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज मॉडेल उपलब्ध करण्यात आले होते. या मॉडेलची किंमत 99,999 रुपये एवढी ठेवण्यात आली होती.

Scroll to Top