Flipkart Sale : Android पेक्षा कमी किमतीत iPhone 14 खरेदी करा, सेलमध्ये 34 हजार रुपयांपर्यंत मिळत आहे सूट

Flipkart Sale iphone

Flipkart Sale : जर तुम्ही कमी किंमतीत आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Flipkart Sale फ्लिपकार्ट बिग इयर एंड सेल सुरू झाला आहे. तुम्ही Apple iPhone 14 58,999 रुपयांच्या सवलतीच्या दरात खरेदी करू शकता. ही किंमत एक्सचेंज ऑफरशिवाय आहे.

जर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा फायदा घेतल्यास, iPhone 14 ची किंमत आणखी कमी होऊ शकते. आयफोन 14 वर किती डिस्काउंट उपलब्ध आहे ते या आजच्या लेखात सविस्तर जाणून घेऊया…

iPhone 14 Flipkart Big Year End Sale

10,901 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटनंतर iPhone 14 फ्लिपकार्टवर 58,999 रुपयांना लिस्टेड आहे. फोनची खरी किंमत 69,900 रुपये आहे. फ्लिपकार्ट (Flipkart Sale) एक्सचेंज डिस्काउंट आणि बँक ऑफर घेऊन ही डील आणखी चांगली होऊ शकते. तुम्ही EMI वर फोन खरेदी करण्यासाठी HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला 10 टक्के सूट मिळू शकते, म्हणजेच iPhone 14 ची किंमत 53,100 रुपये असू शकते.

iPhone 14 वर एक्सचेंज ऑफर

तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केल्यास, तुम्हाला 34,500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते असे फ्लिपकार्ट (Flipkart Sale) कडून सांगण्यात आले आहे. तुम्हाला ही संपूर्ण सूट फक्त निवडक फोन मॉडेल्सवरच मिळू शकेल. यामुळे आयफोन 14 ची किंमत 18,600 रुपयांनी कमी होऊ शकते.

iPhone 14 ची वैशिष्ट्ये (Flipkart Sale)

Apple iPhone 14 Plus पाच रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे – निळा, जांभळा, मिडनाईट, स्टारलाईट आणि लाल. यात 6.7 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. Apple iPhone 13 Pro मॉडेल्समध्ये दिसल्याप्रमाणे स्मार्टफोन सुधारित A15 बायोनिक चिपसह सुसज्ज आहे.Apple iPhone 14 Plus मध्ये 12MP प्रायमरी सेन्सर आणि अल्ट्रा-वाइड सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे.

Scroll to Top