Flipkart Sale : POCO C65 ची पहिली विक्री आजपासून… फ्लॅट 1000 रुपयांची मिळणार सूट

Flipkart Sale : जर तुम्ही बजेट स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. POCO C65 आज पहिल्यांदाच भारतीय बाजारात खरेदीसाठी उपलब्ध होत आहे. POCO C65 MediaTek Helio G85 SoC आणि 8GB रॅम सह येतो.

शिवाय या हँडसेटमध्ये स्क्रीनच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 च्या लेयरसह 90Hz LCD पॅनेल आहे. POCO च्या C65 मध्ये 50MP रियर कॅमेरा आणि 8MP सेल्फी कॅमेरा आहे. चला POCO C65 ची किंमत, लॉन्च ऑफर, स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि भारतात हा फोन कुठून खरेदी (Flipkart Sale) करता येईल याबाबत अधिक जाणून घ्या.

POCO C65 किंमत आणि लॉन्च ऑफर

POCO C65 ची भारतातील किंमत 4GB + 128GB व्हेरिएंटसाठी 8,499 रुपयांपासून सुरू होते आणि मोठ्या व्हेरिएंटसाठी 10,999 रुपयांपर्यंत पैसे तुम्हाला मोजावे लागतील. POCO C65 आज (18 डिसेंबर) दुपारी 12:00 पासून फक्त (Flipkart Sale) द्वारे खरेदीसाठी उपलब्ध असेल. लाँच ऑफर म्हणून, POCO ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड द्वारे व्यवहार केल्यास 1000 रुपयांची सूट (Flipkart Sale)वरुंन मिळत आहे.

POCO C65 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स (Flipkart Sale)

ड्युअल-सिम POCO C65 हा 4G LTE स्मार्टफोन आहे. जो Android 13 वर चालतो. डिव्हाइसला पॉवर करण्यासाठी, फोनमध्ये MediaTek चा ऑक्टा-कोर Helio G85 प्रोसेसर आहे. स्मार्टफोनला 8GB पर्यंत रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेज मिळते. 256GB च्या पुढे स्टोरेज विस्तारासाठी यात मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील आहे.

फीचर्स

डिव्हाइसच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. कॅमेरा मॉड्यूलमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा, 2MP दुय्यम मॅक्रो लेन्स आणि सपोर्टेड लेन्स असतात. हँडसेटच्या पुढील बाजूस 8MP सेल्फी कॅमेरा आहे. 5,000mAh बॅटरीमधून पॉवर मिळते, जी 18W जलद चार्जिंगला सपोर्ट करते. डिव्हाइसमध्ये बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर, 3.5 मिमी ऑडिओ जॅक, वाय-फाय, जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि ब्लूटूथ v5.3 ला देखील सपोर्ट करते.

Scroll to Top