Online Shopping : ऑनलाईन बाजारपेठ होणार 13 लाख कोटींची

Online Shopping : भारतामध्ये डिजिटलायझेशन ने मोठे क्रांती घडवून आणली आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. त्यातही ऑनलाईन खरेदी केल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये मोठीच वाढ झाली आहे. इ कॉमर्स कम्पन्यानी तुम्हाला हवी ती वस्तू तुमच्या हातात तुमच्या दारात आणून द्यायला सुरुवात केल्यामुळे आजकाल बाजरात जाण्याऐवजी ऑनलाईन (Online Shopping) खरेदीला ग्राहकांनी मोठी पसंती दिली आहे.

भारतात गेल्या दशकभरात ऑनलाईन शॉपिंगचे (Online Shopping) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हजारो कोटी रुपयांनी वाढत आहे. एका अंदाजानुसार पुढील पाच वर्षांमध्ये इ कॉमर्सची बाजारपेठ जवळपास 160 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 13 लाख कोटी रुपयांची होईल. बेन अँड कंपनीने या संदर्भात एक अहवाल तयार केला आहे.

काय सांगतो अहवाल ?

जागतिक बाजारपेठेचा विचार केल्यास आपण इतर देशांच्या मागे आहोत. भारताच्या रिटेल बाजारपेठेत ऑनलाईनचा (Online Shopping) वाटा केवळ पाच ते सहा टक्के आहे. 35 टक्के सर्वाधिक वाटा हा चीनचा आहे तर अमेरिकेचा वाटा 24% असून जपान 24.6 ब्रिटनचा 26.5 इतका वाटा आहे.

बिन अँड कंपनीने दिलेल्या अहवालानुसार 2018 पासून 2028 पर्यंत ऑनलाइन बाजारपेठेमध्ये (Online Shopping) काय बदल होईल याची माहिती दिली आहे. या अहवालानुसार 2018 ला 21.7 अब्ज डॉलर, 2019 ला 27.1 अब्ज डॉलर, 2020 ला 38 अब्ज डॉलर, 2021 ला 55 अब्ज डॉलर, २०२२ ला ५६.६ अब्ज डॉलर, 2023 ला 62 अब्ज डॉलर (अंदाजे) आणि 2028 ला 160 अब्ज डॉलर (अंदाजे) अशाप्रकारे ऑनलाइन बाजारपेठ आपली व्यापकता आणखी वाढ होणार असे या अहवालातून दिसत आहे.

Scroll to Top