Technology : LG ने सादर केला पारदर्शक टीव्ही…! जाणून घ्या या अनोख्या TV बद्दल

Technology : समजा तुम्ही टीव्ही पाहत असाल आणि अचानक जर तुमच्या समोरून टीव्ही गायब झाला तर ? आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन … जरी खरं वाटत नसलं तरी हे खरं आहे. जगभर नावाजलेली कंपनी LG ने आता ट्रान्सपरंट टीव्ही (Technology) आणला आहे. एवढेच नाही तर हा टीव्ही वायरलेस आहे. एलजीकडून पारदर्शक टीव्ही सादर करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या अनोख्या टीव्ही बद्दल…

अमेरिकेतील लास वेगास येथे आयोजित CES 2024 कार्यक्रमात जगभरातील लहान-मोठ्या कंपन्या सहभागी होत आहेत. हा कार्यक्रम 9 जानेवारीपासून सुरू असून 12 जानेवारीपर्यंत चालणार आहे. यामध्ये अनेक अनोखे गॅजेट्स लॉन्च (Technology) करण्यात आले आहेत. एलजीकडून एक पारदर्शक टीव्ही सादर करण्यात आला आहे, जो अनेक वैशिष्ट्यांसह लॉन्च करण्यात आला आहे.

अल्फा 11 प्रोसेसरचा वापर

LG ने या कार्यक्रमात OLED Signature T TV सादर केला आहे. ७७ इंच स्क्रीन असलेल्या या टीव्हीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हा टीव्ही OLED पॅनलसह लॉन्च करण्यात आला आहे आणि विशेष (Technology) गोष्ट म्हणजे तो बंद केल्यास तो पूर्णपणे अदृश्य होतो. यात अल्फा 11 प्रोसेसर वापरण्यात आल्याचे एलजीने म्हटले आहे.

वायरलेस टीव्ही(Technology)

LG ने लॉन्च केलेला हा टीव्ही पूर्णपणे वायरलेस तंत्रज्ञानावर काम करतो. यामध्ये एव्ही ट्रान्समिशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे 4k रिझोल्यूशनमध्ये व्हिज्युअल प्रदर्शित करते. यात उत्तम ऑडिओ गुणवत्तेसाठी डाऊन फायरिंग स्पीकर आहेत.

मोड स्विच करू शकता

हा स्मार्ट टीव्ही पारदर्शक आणि नॉर्मल या दोन्ही मोडमध्ये काम करतो. जर वापरकर्त्याला ते पारदर्शक पद्धतीने (Technology) वापरायचे असेल तर ते सहज करता येईल.सोबत आलेल्या रिमोटद्वारे दोन्ही मोड बदलता येतात.

Scroll to Top