Vivo : आणणार स्वस्तात मस्त 5G स्मार्टफोन, लॉन्च होण्याआधीच किंमत आली समोर

Vivo : ने Y सीरीज अंतर्गत अनेक स्मार्टफोन भारतात लॉन्च केले आहेत. आता कंपनी आणखी एका नवीन स्मार्टफोनसाठी चर्चेत आहे. Vivo Y28 5G फोन लवकरच लॉन्च होणार आहे. हे या वर्षी जुलैमध्ये लॉन्च झालेल्या Vivo Y27 5G चा हा पुढचा टप्पा असेल. कंपनी हा फोन बजेट सेगमेंटमध्ये सादर करेल. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल …

बजेट सेगमेंटमध्ये लॉन्च होणार

मिळालेल्या माहितीनुसार ,हे 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज, 6GB+128GB आणि 8GB+128GB स्टोरेजसह लॉन्च केले जाईल. त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये असेल. रिपोर्ट्सनुसार Vivo या फोनवर 2.7 टक्के सूट देखील देईल. ग्राहकांना अत्यंत किफायतशीर EMI वर हा फोन खरेदी करण्याचा पर्याय मिळेल.

Vivo Y28 5G चे काय असतील स्पेसिफिकरशन्स ?

  • हा फोन लॉन्च होण्यापूर्वी त्याचे रंग पर्याय समोर आले आहेत. हा आगामी फोन दोन रंगांच्या पर्यायांसह आणला जाईल. जे क्रिस्टल पर्पल आणि ग्लिटर एक्वा असेल.
  • मिळालेल्या फोन इमेज नुसार फोनच्या मागील पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप प्रदान केला जाईल. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा असेल. यासोबतच व्हॉल्यूम रॉकर आणि साइड बटनही मिळेल.
  • अहवाल सूचित करतो की आगामी फोन MediaTek Dimensity 6100 Plus प्रोसेसरद्वारे समर्थित असेल. हा प्रोसेसर 6 एनएम तंत्रज्ञानावर काम करतो.
  • फोनला पावर देण्यासाठी, जलद चार्जिंगला सपोर्ट करणारी 5000 mAh बॅटरी प्रदान केली जाईल.
Scroll to Top