Amazon : चे प्राईम मेंबर व्हायचे आहे ? काय आहे फायदा ? जाणून घ्या सर्वकाही

देशभरात झपाट्याने लकप्रिय झालेली ऑनलाईन शॉपिंग कपंनी म्हणजे Amazon . हे असं ऑनलाईन दुकान आहे जिथे तुम्ही एका क्लिक वर हव्या त्या वस्तू देशाच्या कोणत्याही भागात घरबसल्या खरेदी करू शकता. Amazon हे इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल लॅपटॉप, , गृहोपयोगी वस्तू अशा अनेक वस्तूंच्या खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. Amazon तसेच मनोरंजन क्षेत्रातही काम करते. Amazon ने आपल्या प्राईम मेम्बर साठी भरघोस सूट देऊ केली आहे. आता प्राईम मेम्बर म्हणजे काय ? ते कसे व्हायचे आणि त्याचे काय फायदे आहेत ? हे जाणून घेऊया …

आता प्राईम मेंबर म्हणजे काय ? जसे आपले फॅमिली डॉक्टर्स असतात. त्यांच्याशिवाय आपण इलाज करण्यासाठी कुठेही जात नाही. गरज पडल्यास ते घरी येऊन आपल्याला ट्रीटमेंट देतात म्हणजेच त्या डॉक्टर साठी आपण खास असतो. तसेच Amazon साठी प्राईम मेंबर म्हणजे आपण खास ग्राहक होय. आपल्याला Amazon च्या सुविधा थोड्या अधिक मिळतात म्हणजेच Amazon कडून प्राईम मेंबरना खास ऑफर्स स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजे एखादी वस्तू सामान्यरित्या तुम्ही ऍमेझॉनवर १०० रुपयांना खरेदी करीत असाल तर प्राईम मेंबरला ती ८० रुपयांना मिळेल.

प्राईम मेंबर प्लॅन

प्राईम मेंबर होण्यासाठी ३० दिवसांची फ्री ट्रायल घेऊ शकता. ३० दिवसानंतर तुम्हाला वर्षाचे १४९९ रुपये भरावे लागतील.

UPI/क्रेडिट /डेबिट द्वारे २९९ रुपये मासिक मेम्बरशिप घेऊ शकता.

UPI/क्रेडिट /डेबिट द्वारे ३ महिन्यासाठी ५९९ भरून मेम्बरशिप घेऊ शकता.

एका वर्षासाठी १४९९ रुपये भरून मेम्बरशिप घेऊ शकता

प्राईम मेंबर कसे बनाल ?

  1. सर्व प्रथम Amazon च्या प्राइम पेज वर जा.
  2. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या साइन-अप पर्यायावर क्लिक करा.
  3. नंतर तेथे विचारलेली माहिती देऊन पेमेंट करा.

तुम्हाला तुमचा प्लॅन मासिक ते वार्षिक किंवा वार्षिक ते मासिक असा बदलायचा असेल तर तेही करता येईल.

प्राईम मेंबरशिपचा काय आहे फायदा ?

–Amazon Prime वरील सर्व मनोरंजनात्मक कार्यक्रम पहायला मिळतील.

–Amazon Prime वरील संगीत ऐकायला मिळेल.

–5% कॅशबॅक ,2% बिल पेमेंट्स,रिचार्ज वर सूट, 3 महिने नो कॉस्ट EMI

–मोबाईल , फॅशन , रोजच्या सामान खरेदीवर 10 % डिस्काउंट

–एका दिवसात वस्तूची फ्री होम डिलिव्हरी

सेलमध्ये एक्सट्रा बेनिफिट

या Amazon Great Indian Festival Sale 2023 मध्ये प्राइम मेंबर्ससाठी खूप खास डील आणि डिस्काउंट असतील आणि त्यांच्यासाठी हा सेल 1 दिवस अगोदर लाइव्ह होईल जेणेकरून ते आकर्षक डील आणि डिस्काउंटचा लाभ घेऊ शकतील. .

Scroll to Top